Welcome to

EASY SCIENCE EDUCATION PROJECT

सहज विज्ञान शिक्षण प्रकल्प 

विज्ञान इंटर्नशिप प्रोग्राम

गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत, तरीही विद्यार्थी पास झाले, किंबहुना पुढे ढकलले गेले. येणारे शालेय वर्ष देखील ऑनलाईन असण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना विज्ञान विषय कितपत समजला आहे, किंवा विज्ञानातील संकल्पना कितपत समजल्या आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. याबाबतीत अनेक विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आमच्या हे लक्षात आले की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन साठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील संकल्पना मराठीतून समजून घेण्यासाठी पुस्तकातील किंवा गाईड मधील भाषा अवघड वाटते. बऱ्याच विद्यार्थ्यांना संकल्पना जरी समजत असल्या तरी उत्तर लिहिताना नेमकं काय लिहावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये गोंधळाची अवस्था आहे.
विद्यार्थ्यांच्या करिअर मधील महत्वाच्या टप्प्यावर असे गाफील राहून परवडणारे नाही, इथे पाया कच्चा राहिला तर पुढे फार अडचणी निर्माण होतात.
आणि म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य सहज आणि सुलभ अशा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून तयार करणे हे या प्रोग्रॅम चे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि दोन, इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इयत्ता आठवी सामान्य विज्ञान या विषयाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित स्वयम् अध्ययनासाठी लागणाऱ्या सोप्या भाषेत नोट्स तयार करणे. आणि प्रत्येक प्रकरणाच्या स्वाध्यायाचे अचूक आणि नेमकेपणाने सोप्या भाषेत लक्षात राहतील अशी उत्तरे बनवणे हे या प्रोग्रॅम चे उद्दिष्ट असेल. 

यामध्ये आपण कसे योगदान देऊ शकता?

आपणास कोणत्याही एका इयत्तेतील विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकातील काही प्रकरणे अभ्यासासाठी दिली जातील. दिलेल्या प्रत्येक प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करून आपणास त्या प्रकरणांमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत अचूकपणे नेमकेपणाने लिहावयाची (Typing) आहेत. तसेच त्या प्रकरणावरील स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे देखील नेमकेपणाने मोजक्याच शब्दात पण सर्वसमाविष्ट अचूकपणे लिहावयाचे आहेत.

टीप - तसे पाहायला गेलं तर सर्व उत्तरं गाईडमध्ये आहेत, पण गाईड मधील उत्तरांची भाषा अवघड असल्यामुळे तुमच्या सोप्या भाषेत याचे उत्तर तयार केली तर अधिक उत्तम. शिवाय तुम्ही उत्तराच्या सोबत एखादी कृती किंवा संदर्भ चित्र दिले तर फारच उत्तम.

तर अशा पद्धतीने आपणास दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण करून सबमिट करावयाचे आहे. या विज्ञान इंटर्नशिपचा कार्यकाळ १ जुलै ते ३१ जुलै २०२१ असेल. कार्यकाल संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत आपणास या योगदानाबद्दल संस्थेचे प्रमाणपत्र मिळेल.

आपली संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करत असल्यामुळे या कामासाठी कोणताही आर्थिक मोबदला नाही. पण आपणास इथे या क्षेत्रातील दिग्गज लोकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळेल. आजच्या डिजीटल युगात आवश्यक असणारी डिजीटल कौशल्ये विकसित होण्यात मदत होईल. आणि जर आपण शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असाल तर आमच्या संस्थेचे आजीवन सदस्यत्व आपणास देण्यात येईल. शिवाय इतर फायदे देखील आहेतच..